Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागावच्या वरद तेली याला शहीद जवान अशोक बिरंजे स्मृती पुरस्कार प्रदान

महागाव : शहीद जवान अशोक बिरंजे स्मृती पुरस्कार प्राचार्य आय. एस. पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना वरद तेली. सोबत वीरबंधू सुरेश बिरंजे,पालक, सैनिक संघटनेचे पदाधिकारी.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): बेंगलोर येथील वीररत्न फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा शहीद जवान अशोक बाबुराव बिरंजे स्मृती पुरस्कार महागाव येथील महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील एसएससी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या वरद संजय तेली या विद्यार्थ्याला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला.

     



सन्मान चिन्ह व तीन हजार रुपये असे या स्मृती पुरस्काराचे स्वरूप आहे. प्राचार्य आय. एस. पाटील यांच्या हस्ते वरदला ते वितरित करण्यात आले. भावनिक परिपक्वता, सामाजिक जबाबदारी, नेतृत्व गुणवत्ता, शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती या सर्व बाबींचा विचार करून वरद याला हा स्मृती पुरस्कार देण्यात आला आहे.



यावेळी  माजी जि. प. सदस्य ॲड. हणमंतराव पाटील, माजी सभापती विजयराव पाटील, संस्था प्रतिनिधी प्रा.डी. एस. पाटील,आण्णासाहेब पाटील, सरपंच प्रशांत शिंदे,उपसरपंच संदीप कोकितकर,उंबरवाडी ग्रा. प.सदस्य प्रवीण चिमणे , पर्यवेक्षक  मोहन कांबळे, वीरबंधू सुरेश बिरंजे,संजय तेली यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आजी-माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.