चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय
मतदारसंघात विविध उद्योगधंदे आणण्याचा मानस
पक्ष की अपक्ष लढणार? याकडे सर्व जनतेचे लक्ष
गडहिंग्लज (प्रतिनिधी): केवळ रस्ते व गटारी करणे म्हणजे विकास नव्हे. यापलीकडेही जाऊन शाश्वत विकास करणे गरजेचे आहे. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी विविध उद्योगधंदे आणण्याचा माझा मानस आहे, असे सांगतानाच राजकारणातून समाजकारण करण्यासाठी येणारी विधानसभा निवडणूक चंदगड मतदारसंघातून लढवणार असल्याची घोषणा अथर्व- दौलत साखर कारखान्याचे चेअरमन व उद्योजक मानसिंग खोराटे यांनी नुकतेच चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील कारखान्याच्या कार्यस्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत केल्याने चंदगड विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. उद्योजक मानसिंग खोराटे यांनी अद्याप कोणत्या पक्षामार्फत निवडणूक लढविणार हे जरी स्पष्ट केले नसले तरी शेवटी अपक्ष का होईना निवडणूक लढविणारच असा निर्धार केल्याने चंदगड विधानसभा मतदारसंघात आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
कोण आहेत हे मानसिंग खोराटे?
मानसिंग खोराटे हे साखर कारखानदारीतील मोठे उद्योजक आहेत. चंदगड तालुक्यातील दौलत कारखाना त्यानी चालवायला घेतला आहे. गेल्या पाच वर्षात विविध संकटे व अडथळ्यांना तोंड देत त्यांनी दौलत साखर कारखाना उत्कृष्टरित्या चालवला आहे. या पाठोपाठच त्यांनी सोलापूर व लातूर येथील दोन कारखाने विकत घेतले आहेत. अशा एकूण तीन कारखान्यांचा मोठा डोलारा ते यशस्वीरित्या सांभाळत हजारो जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. उद्योजक मानसिंग खोराटे यांची शून्यातून सुरू झालेली वाटचाल व त्यांनी प्रामाणिकपणे केलेली प्रगती सर्वांनाच थक्क करणारी आहे. साखर कारखानदारीत वाटचाल करत असताना राजकीय शक्ती शिवाय या क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी मार्गी लागत नाहीत हा अनुभव त्यांना आला आहे. दरम्यान, त्यांना एका मोठ्या पक्षाच्या बड्या नेत्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी त्यांच्या नावाचा विचार करत असल्याचे सांगितले. ज्या मोठ्या राजकीय शक्तीची त्यांना गरज होती त्याच शक्तीची संधी त्यांना चालून आल्याने उद्योजक श्री खोराटे यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ते चंदगड विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार आहेत. या माध्यमातून या ठिकाणी विविध उद्योगधंदे आणून सुशिक्षित बेरोजगार लोकांच्या हाताला काम देण्याचा त्यांचा मानस आहे.
उद्योजक मानसिंग खोराटे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
यावेळी ॲड. संतोष मळवीकर, मनसेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, रामलिंग पाटील, वैजनाथ हुसेनकर, सुनील देसाई, सतीश निर्मळकर, ॲड. संतोष मळवीकर फौंडेशनचे अध्यक्ष बापू शिरगावकर, रवी नाईक, दया गावडे यांच्यासह विविध युवा नेतृत्वानी आपल्या मनोगतात उद्योजक मानसिंग खोराटे यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी सुनील नाडगौडा, कुलदीप दळवी, संदीप शिंदे, सूर्यकांत नाईक, बाळू पेडणेकर, वैजनाथ उसणकर, भगवंत पाटील यांच्यासह इतर उपस्थित होते.




