Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महागाव मधील हिरकणी महोत्सवात छोट्या पडद्यावरील कलाकारांनी जिंकली महिलांची मने

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ. नंदाताई कुपेकर- बाभुळकर यांच्या वतीने हिरकणी महोत्सवाचे आयोजन 


अभिनेता ऋषिकेश शेलार, अभिनेत्री शिवानी रांगोळे, तेजश्री प्रधान यांनी साधला महिलांशी संवाद





गडहिंग्लज (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील नेत्या सौ. नंदाताई कुपेकर- बाभुळकर यांच्या वतीने आयोजित महागाव येथील हिरकणी महोत्सवात छोट्या पडद्यावरील कलाकारांनी उपस्थित महिलांची मने जिंकली.



महागाव येथील अनिकेत हॉल येथे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हिरकणी महोत्सव  : नारीशक्ती मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतील अभिनेता ऋषिकेश शेलार, अभिनेत्री शिवानी रांगोळी व होणार 'सून मी या घरची' या मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधान यांची उपस्थिती लाभल्याने हा मेळावा लक्षवेधी ठरला. मालिकेतील या कलाकारांनी महिलांशी मोकळेपणाने गप्पा मारल्याने या नारी शक्ती मेळाव्याला रंगत आली.




यावेळी उखाणा स्पर्धेतील विजेत्या महिलांना पारितोषिक वितरण करण्यात आले. छोट्या पडद्यांवरील विविध मालिकांमध्ये काम करत असताना सौ नंदाताई कुपेकर बाभुळकर यांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाल्याचे या उपस्थित कलाकारांनी सांगितले. नंदाताई उच्चशिक्षित असल्याने त्यांचे नेतृत्व महिलांसाठी प्रेरणा व आदर्श ठरेल. या विभागातील महिलांचे विविध प्रश्न व समस्या त्यांच्या माध्यमातून निश्चितच सुटतील असा विश्वास या कलाकारांनी व्यक्त केल. यावेळी मनिषा तेली, माजी प. स. सभापती अमर चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. 



यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी जि. प. सदस्य शिवप्रसाद तेली, जिल्हाध्यक्ष व्ही.बी.पाटील, सरसेनापती प्रतापराव गुजर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर, महिला जिल्हाध्यक्ष दीपा पाटील, सुश्रुत बाभुळकर, शिवाजीराव खोत, अनिल घाटगे,आजरा तालुका अध्यक्ष मुकुंदराव देसाई, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष शिवाजीराव माने, चंदगड तालुका अध्यक्ष शिवाजीराव सावंत, शिवानंद माळी, रुपा खांडेकर, उदय चव्हाण यांच्यासह महिला मोठया संख्यने उपस्थित होत्या. स्वागत व प्रास्ताविक रामराजे कुपेकर यांनी केले.







व्हिडीओ येथे पहा 👇👇



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.