Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव गावातील विविध समस्या सोडवाव्यात !

ठाकरे शिवसेना पक्षाचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांची मागणी 


ग्रामपंचायतीला निवेदन देत समस्यांकडे वेधले लक्ष





गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव गावातील विविध समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी ठाकरे शिवसेना पक्षाचे उपतालुकाप्रमुख वसंत नाईक यांनी ग्रामपंचायतीकडे निवेदनातून केली आहे. 



भीमनगर येथील दुर्गादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर रावसाहेब कांबळे यांच्या घरालगत असलेल्या गटारीची दुर्दशा झाली आहे. फक्त दोन फूट गटारावरून ये जा करावे लागत आहे. येथून वाहने घेऊन जाणे अवघड बनले आहे. येथील गटारीचे बांधकाम करणे गरजेचे आहे,  गावातील नळपाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनला मुख्य रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी गळती असून ही गळती काढण्यात यावी, गावात अनेक ठिकाणी पथदिवे बंद अवस्थेत आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. हे पथदिवे सुरू करावेत, नदीघाटावरील स्मशान शेडचे पत्रे जीर्ण झाले असून त्यांची दुरुस्ती करण्यात यावी आदी समस्यांकडे श्री. नाईक यांनी लक्ष वेधले आहे.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.