गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुका ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी मुगळी वाचनालयाचे ग्रंथपाल कल्लापा दुंडापा धनवडे तर उपाध्यक्षपदी माद्याळ वाचनालयाचे सौ. पुष्पा अनंत गुरव यांची निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्रीपाद स्वामी होते.
अध्यक्ष पदासाठी कल्लापा धनवडे यांचे नाव महादेव भकरी त्यांनी सुचवले तर अनुमोदन सौ. सुषमा पोवार यांनी दिले. उपाध्यक्षपदासाठी सौ. पुष्पा गुरव यांचे नाव सौ. सुधा सावंत यांनी सुचवले तर रेखा मोहिते यांनी अनुमोदन दिले.
सचिव सचिन ओहरा यांनी स्वागत करुन जमाखर्च वाचुन दाखवले. या बैठकीमध्ये शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना 40 टक्के अनुदान वाढ विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मिळावे या मागणीचे निवेदन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना पाठविण्याचे ठरले.
बागी वाचनालय येथे झालेल्या बैठकीस सुभाष खोत (गडहिंग्लज), सचिन ओहरा (दुडंगे ), श्रीपाद स्वामी (मुगळी), महादेव भकरी (भडगाव), रेखा मोहिते (उंबरवाडी), सुधा सावंत (हलकर्णी), नामदेव पोटे (गडहिंग्लज) सुषमा पोवार ( ऐनापुर), शिवाजी मांगले (जरळी), आनंद गुरव (माद्याळ), कार्यवाह राजु भुईम्बर ( गडहिंग्लज) यांच्यासह गडहिंग्लज तालुक्यातील ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. आभार खजिनदार शिवाजी मांगले यांनी मानले.

