पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंगसाठी 932 विद्यार्थ्यांचे विक्रमी प्रवेश
विद्यार्थी व पालकांची विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (तालुका गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियंत्रिकी विभागाकडील पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग महाविद्यालयासाठी शैक्षणिक वर्ष 2024- 25 साठी प्रथम व थेट द्वितीय वर्षासाठी विक्रमी म्हणजेच 932 विद्यार्थ्यांनी प्रथम पसंती देऊन प्रवेश घेतला आहे. यामुळे या समूहावरील विद्यार्थी व पालकांची विश्वासार्हता पुन्हा सिद्ध झाली आहे.
पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग पदवीचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर हमखास व झटपट नोकरी मिळण्याची संधी असते. यामुळे बहुतांश विद्यार्थी प्लेसमेंट व गुणवत्ता बघूनच महाविद्यालयाला पसंती देत असतात. ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम अभियंता निर्माण करण्यासाठी संत गजानन अभियांत्रिकी विभागाने गुणवत्ता ते प्लेसमेंट पर्यंतच्या सर्व सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिला आहे. तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग, नँक, एनबीए मानांकने, उज्वल निकाल व गुणवत्तेची परंपरा, प्लेसमेंट द्वारे दरवर्षी नामवंत कंपनीत सर्वाधिक वेतन वर विद्यार्थ्यांची नियुक्ती, पॉलिटेक्निक मधील एका विद्यार्थ्याला दोन ठिकाणी नोकरीच्या संधी, अग्रणी महाविद्यालयाचा दर्जा, एमएसबी टीई कडून दरवर्षी एक्सलन्स दर्जा, शासनाच्या सर्व शिष्यवृत्या वाहतूक व्यवस्था, फिनिशिंग स्कूलचा उपक्रम, राष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान परिषदेचे व्यासपीठ, रोबोटिक लॅब सह वर्षभरात राबवण्यात येणारे विविध उपक्रमामुळे अभियांत्रिकी विभाग अल्पावधीतच नावारूपाला आले आहे. परिणामी प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आलेख दरवर्षी वाढतच आहे.
यासाठी संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण, ॲड बाळासाहेब चव्हाण, रजिस्टार शिरीष गणाचार्य, प्राचार्य डॉ. एस. एच. सावंत, प्रा. रोहिणी पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे.
शिक्षण समूहात स्टार्टअप कल्चर राबवणार : डॉ. संजय चव्हाण
नवउद्योजकाला चालना मिळण्यासाठी भारत सरकारने स्टार्टअप योजना सुरू केला असून ही योजना पुढील वर्षीपासून अभियांत्रिकी विभागात प्रभावीपणे राबवत स्टार्टअप कल्चर हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवणार असल्याची संस्थेचे विश्वस्त डॉ. संजय चव्हाण यांनी सांगितले.



