324 बुद्धिबळपटूंचा सहभाग
स्पर्धेत जागृती हायस्कूलचे वर्चस्व
गडहिंग्लज (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर, जिल्हा क्रीडा कार्यालय कोल्हापूर व गडहिंग्लज तालुका क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीने गडहिंग्लज शालेय शासकीय 14, 17 व 19 वयोगटातील मुला मुलींच्या बुद्धिबळ स्पर्धा माध्यमिक पतसंस्थेच्या स्व. व्ही. एस. आलुरकर सभागृहामध्ये उत्साहात पार पडल्या. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्वागत व प्रास्ताविक संपत सावंत यांनी केले. स्पर्धेचे उदघाटन सहाय्यक क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, माध्यमिक पतसंस्थेच्या चेअरमन सौ. ज्योत्स्ना पताडे, किलबिलचे मुख्याध्यापक आनंदा घोलराखे, प्रा.शिवानी पेडणेकर, विनायक नाईक, राजाराम माने, राहुल रेडेकर यांच्या हस्ते झाले. सुधाकर जमादार, सौ. ज्योत्स्ना पताडे व शिवानी पेडणेकर यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत विविध शाळेतून 324 बुद्धिबळ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत जागृती हायस्कूलने निर्विवाद वर्चस्व मिळविले. प्रत्येक गटातील विजेत्या पाच खेळाडूंची निवड केली. विद्यालय केर्ली येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
14 वर्षे मुले- श्रेयस पाटील जागृती, श्रेयांस हराडे सर्वोदय, हर्षल बामणे सिम्बॉयसिस, अथर्व सुतार करंबळी, वेदांत पाटील न्यू होरायझन.
14 वर्षे मुली- नीता धुळाज मुत्नाळ, दीक्षा पाटील न्यू होरायझन,राधिका फडतरे बसर्गे, स्नेहल नाईक नंदनवाड, प्रतीक्षा भुलानावर बसर्गे.
17वर्षे मुले- स्वरूप साळवे सो.वि.दि. शिंदे, गौरांग शिवगण जागृती, समर्थ पाटील गडहिंग्लज हायस्कूल, गौरेश बिरंजे जागृती, संदीप भोसरी जागृती.
17 वर्षे मुली- हर्षिता खोपकर क्रियेटिव्ह, वैष्णवी कुराडे नंदनवाड, सेजल पाटील जागृती, प्रणाली नार्वेकर नंदनवाढ, सिद्धी पाटील केदारी रेडेकर.
19वर्षे मुले- प्रथमेश माळी एमआर ,आर्यन पवार एम आर, तेजस नाईक साधना, अनर्व कोकीतकर जागृती ,साईराज हसबे नेसरी.
19 वर्षे मुली- राजेश्विनी पाटील जागृती, समीक्षा पाटील जागृती, संजना पाटील जागृती,मंजुळा कदम गडहिंग्लज हायस्कूल, स्फूर्ती यरनाळे एम.आर.
स्पर्धेचे परीक्षण राजाराम माने, संपत सावंत, राहुल रेडेकर, सुनील रेडेकर, वासू पाटील, संतोष देसाई, रमेश चौगुले, संदेश कोकितकर,दयानंद ग्वाडी सुभाष तिप्पे, देवदत्त कांबळे, बाळासाहेब खरात यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील रेडेकर यांनी केले. आभार मदन दंडगीदास यांनी मानले.




.jpg)




