गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील कै. बापुसो आपासो कितुरकर सार्वजनिक मोफत वाचनालयात काल कृषी देवता भगवान श्री बलराम यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे संचालक प्रकाश गोरुले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी भारतीय किसान संघाचे कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष बाळगोंडा पाटील, बाळासाहेब कोणकेरी, ग्रामसमिती अध्यक्ष सचिन जाधव, जिल्हामंत्री काशीनाथ मोर्ती, आपासाहेब कितुरकर, चंद्रकात कोडोळी, विरपाक्ष हुदली, पापा परीट, विजय कोडोळी, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक उपस्थित होते.

