Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुंडगे गावच्या सरपंचपदी सौ. रेखा लाटकर यांची बिनविरोध निवड



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील दुंडगे गावच्या सरपंच पदी सौ. रेखा अरुण लाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवड ही मंडल अधिकारी प्रवीण कदम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.



यावेळी उपसरपंच अण्णासाहेब पाटील, एस. बी. गाडीवड्ड, ग्रामसेवक व्ही.जी. मोटे, तलाठी एस. आर. वाघमारे, पोलीस पाटील सागर कांबळे यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. निवडीनंतर विविध मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी सरपंच सौ. रेखा लाटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.