Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुकास्तरीय शालेय शासकीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत जागृती हायस्कूलला विजेतेपद

नौकुडचा अष्टपैलू खेळाडू प्रीतम दिवटी ठरला सामनावीर व मालिकावीर





गडहिंग्लज (प्रतिनिधी): न्यू होराईझन व पार्वती हायस्कूल, औरनाळच्या मैदानावर पार पडलेल्या गडहिंग्लज तालुकास्तरीय शालेय शासकीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील जागृती हायस्कूलच्या मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात सर्वोदय स्कूलवर 32 धावांनी विजय मिळवून अजिंक्यपद मिळविले. यामध्ये नौकुडचा अष्टपैलू खेळाडू प्रीतम दिवटी सामनावीर व मालिकावीर ठरला. 



जागृती हायस्कूलच्या विजेत्या क्रिकेट संघाची जयसिंगपूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे. शालेय शासकीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांच्या हस्ते झाले.


                 सामनावीर व मालिकावीर प्रीतम दिवटी 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.