ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व नाईक समाजाच्या वतीने सत्कार करून दिल्या शुभेच्छा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी गावचे सरपंच करवीर उथळे यांना राजर्षी शाहू प्रतिष्ठान, दक्ष मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जागृत शोध वृत्तपत्र यांच्यावतीने 'महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार 2024' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीत पदाधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व नाईक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुणे येथील सोहळ्यात नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत सदस्य बसवराज बुध यांनी स्वागत तर ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या वतीने सरपंच करवीर उथळे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर नाईक समाजाच्या वतीने उपसरपंच सौ. सोनव्वा कतीगार व मारुती कतीगार यांच्या हस्ते समाज बांधवांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी नाईक समाजाच्या स्मशानभूमीत शेडची उभारणी व स्ट्रेचर उपलब्ध करून दिल्याबद्दल समाज बांधवांनी सरपंच करवीर उथळे यांचे आभार मानत महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या माध्यमातून गावचे नाव उज्वल झाल्याची भावना व्यक्त करत त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी उपसरपंच सौ. सोनव्वा कतीगार, सदस्या श्रीमती अक्काताई हजेरी, सौ. मंजुळा चौगुले, सदस्य अर्जुन कांबळे यांच्यासह बाळासाहेब निंबाळकर, मारुती कतीगार, आनंद नरेवाडी, राजेंद्र मलकानावर, रवींद्र नाईक, साताप्पा पुजेरी, कल्लाप्पा गडदराम, ग्रामपंचायत कर्मचारी करवीर भोई, अब्दुलरहमान ताहसीलदार, सुरेश भोई, सिद्धाप्पा धनगर, तानाजी सुतार उपस्थित होते.




