उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत केली विनंती
तलाठी श्री. कातकर यांचे काम समाधानकारक असल्याचे ग्रामस्थांचे मत
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील कडलगे व इदरगुच्ची येथे कार्यरत असलेले तलाठी विलास कातकर यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी कडलगे ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आले आहे.
कडलगे व इदरगुच्ची ही दोन गावे कर्नाटक हद्दीलगत आहेत. या गावांसाठी विलास कातकर हे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. श्री. कातकर यांच्या कामाची पद्धत चांगली असून ग्रामस्थांची कामे वेळेत होत असल्याने त्यांच्या कामाबद्दल ग्रामस्थांतून समाधान आहे. त्यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी या निवेदनातून केली आहे.
यावेळी उपसरपंच आनंदराव जाधव, मलगोंडा यादगुडी, भीमराव बागी, मंगल नाईक यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

