Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन

गडहिंग्लज : येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभा मंडपाचे भूमिपूजन करताना पालकमंत्री हसन मुश्रीफ. यावेळी उपस्थित शिवलिंगेश्वर महास्वामीजी, गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, महंत सिद्धेश्वर स्वामीजी, भगवानगिरी महाराज, आनंद गोसावी महाराज, आमदार राजेश पाटील यांच्यासह इतर. 
                                             छायाचित्र : मज्जिद किल्लेदार 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सभा मंडपाचे भूमिपूजन शिवलिंगेश्वर महास्वामीजी, गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, महंत सिद्धेश्वर स्वामीजी, भगवानगिरी महाराज, आनंद गोसावी महाराज यांच्या उपस्थितीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.



यावेळी पालकमंत्री  हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांची भाषणे तर गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी, भगवानगिरी महाराज, आनंद गोसावी महाराज, महंत सिद्धेश्वर स्वामीजी यांची आशीर्वचने झाली. याप्रसंगी मंदिराचे आर्किटेक्ट अमोल पाटणकर, अमित लोहार, रमेश गायकवाड, आप्पासाहेब कोड्ड, जितेंद्र नाईक, ऋषिकेश जोशी यांचा सत्कार करण्यात आला.



कार्यक्रमास तहसीलदार ऋषिकेत शेळके, पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, दत्तात्रय बरगे, किरणराव कदम, वसंतराव यमगेकर, राजेंद्र गड्यानावर, सिद्धार्थ बन्ने, बसवराज खणगावे, नागेश चौगुले, रमेश रिंगणे, चंद्रकांत सावंत, बसवराज आजरी, प्रा. किसनराव कुराडे, अरविंद कित्तुरकर, विठ्ठल भमानगोळ यांच्यासह विश्वस्त, हक्कदार, मानकरी, कुंभार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र तारळे यांनी तर प्रास्ताविक विश्वस्त सुरेश कोळकी यांनी केले. आभार प्रीतम कापसे यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.