Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय थल सैनिक कॅम्पमध्ये ‘शिवरा‌ज’च्या वैष्णवी भोईटेला सुवर्णपदक



गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाची एन. सी. सी. कैडेट वैष्णवी विजय भोईटे हिने डी. जी. एन. सी. सी. राम कृष्णपुराण, न्यु दिल्ली येथे झालेल्या ऑल इंडिया थल सैनिक एन. सी. सी. कॅम्पमध्ये महाराष्ट्र एन. सी. सी. डिरेक्टोरेट मधून सहभाग नोंदवताना तेथे घेण्यात आलेल्या टेंट पीचींग स्पर्धेत महाराष्ट्र डिरेक्टोरेटला सुवर्ण पदक पटकाविले. संपूर्ण भारतात शिवराज महाविद्यालयाचे नांव उज्वल केले. या कॅम्पमध्ये निवड होण्यासाठी वैष्णवी भोईटेला महाराष्ट्रातीला सात कॅम्प करावे लागले. वैष्णवीने प्रयत्न, जिद्द, चिकाटीच्या जोरावर हे यश संपादित केले आहे. आहे. या यशाबद्दल महाविद्यालयात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.




एन. सी. सी. कैडेट वैष्णवी भोईटे यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ. अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ एस एम कदम यांचे प्रोत्साहन तर 56 महारा‌ष्ट्र बटालीयन एन. सी. सी. चे कमांडिंग ऑफीसर कर्नल पुनीत गोगीया, कॅप्टन डॉ. राहुल मगदूम, प्रा जयवंत पाटील यांचे मार्गदर्शन व सिनीअर अंडर ऑफिसर रिध्दी डवरी यांचे सहकार्य लाभले. या सत्काराप्रसंगी पर्यवेक्षक तानाजी चौगुले, मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.