Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती 


 




मुंबई  : महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.



आज मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक आज  मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.




दि.२९ सप्टेंबर २०२४  रोजी रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेचा  राज्यस्तरीय कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात आढावा घेण्यात आला.


            


व्यासपीठाचे व्यवस्थापन, कायदा व सुरक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, कार्यक्रमस्थळी पार्किंगची व्यवस्था, पिण्याचे पाणी, लाभार्थ्यांची यशोगाथा याबाबतच्या महत्वाच्या सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.