Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बदलापुरात चिमुरडींवर अत्याचार केलेल्या नराधमाचा एन्काऊंटर



मुंबई : बदलापूर येथील शाळेतील चिमुरडींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्युत्तर दाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.



याबाबतची अधिक माहिती अशी की, ठाणे क्राइम ब्रँचची टीम घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी अक्षयला घेऊन जात होते. यावेळी अक्षयने पोलीसांजवळील बंदूक हिसकावून पोलिसांच्या गाडीवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. यामध्ये अक्षय शिंदे ठार झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.