पदवीचे शिक्षण, बालवाडी शिक्षिका कोर्स पूर्ण करण्याची सुवर्णसंधी
नव्याने सुरु झालेल्या हलकर्णी महाविद्यालयामुळे सोय
गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत संस्था अध्यक्ष एम.जी. पाटील यांनी दिली महाविद्यालयातील अभ्यासक्रमांची माहिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तांबाळेश्वर शिक्षण संस्थेने गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी भागातील महिला, मुली व विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवे दालन खुले केले आहे. हलकर्णी महाविद्यालय हलकर्णी हे नव्याने महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी पदवीचे प्रथम वर्षाचे शिक्षण, बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सर्वांना शुभेच्छा देत संस्थेचे अध्यक्ष एम.जी.पाटील यांनी महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांची माहिती दिली.
यावेळी माहिती देताना अध्यक्ष एम. जी. पाटील यांनी सांगितले की, बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर काही मुलांना, मुलींना, महिलांना व गृहिणींना पदवीचे शिक्षण घेणे शक्य होत नाही. ही समस्या ओळखून आम्ही तांबळेश्वर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मान्यता प्राप्त हलकर्णी येथे नवीन महाविद्यालय सुरू केले आहे. याठिकाणी पदवीच्या प्रथम वर्षाचे शिक्षण सुरु करण्यात आले आहे. याला विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद लाभला असून अध्यापनाचे काम सुरू झाले आहे. हलकर्णी परिसरातील विविध गावांसह सीमा भागातील मुले व मुली, महिला, गृहिणी यांच्या शिक्षणाची सोय यामुळे झाली आहे. या संस्थेत नोकर भरती करताना परिसरातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यावर अधिक भर दिला गेला आहे. अद्यापही काही पदांची भरती करण्यात येणार असून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. याकडे देखील अध्यक्ष श्री. पाटील यांनी लक्ष वेधले.
महिलांसाठी बालवाडी शिक्षिका कोर्सही सुरू
हलकर्णी महाविद्यालयास बालवाडी शिक्षिका कोर्सही सुरु करण्यास शिवाजी विद्यापीठाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या महाविद्यालयात या कोर्ससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या कोर्सला प्रवेशासाठी किमान इयत्ता दहावी उत्तीर्ण अट असून बारावी व पदवीधर उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. शासकीय नोकरीसाठी हा कोर्स उपयुक्त असल्याने जास्तीत जास्त महिलांना या अभ्यासक्रमाचा फायदा होणार आहे. गणेश चतुर्थीनंतर या अभ्यासक्रमाच्या अध्यापनाचे काम सुरू होणार आहे. तत्पूर्वी इच्छुक महिलांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित करावा असे आवाहन अध्यक्ष एम.जी. पाटील यांनी केले आहे.
कोर्सला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक महिलांनी 7387066034, 8805548546 अथवा प्राचार्या सौ. बिस्मिल्ला मुल्ला 7420868419 व अध्यक्ष एम. जी. पाटील 9604136181 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

