गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहर व तालुक्यात विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साही व जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले.
शहर व परिसरात पहाटेपासूनच कुंभार वाड्यात नागरिकांनी गणेश मूर्ती आणण्यासाठी मोठी गर्दी केली होती. ढोल, ताशा यासह विविध वाद्यांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत घरोघरी गणेश मूर्ती आणण्यात आल्या. मोठ्या भक्ती भावाने मंगलमय वातावरणात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आता सायंकाळच्या सत्रात सार्वजनिक गणेश मंडळ गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करणार आहेत. घरगुती गणपती आगमनाचे छायाचित्रकार मज्जिद किल्लेदार यांनी टिपलेली ही छायाचित्रे 👇👇




























