निकष निश्चितीसाठी समिती केली गठीत
आजरा : आजरा तालुक्यातील उत्तुर विभाग स्वतंत्र तालुका होण्याच्या दृष्टीने हालचाली गतिमान झाल्या असून निकष निश्चितीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे.
आजरा तालुक्यातील उत्तुर विभाग हा आजरा, गडहिंग्लज, कागल व भुदरगड तालुक्याच्या सीमेवर 35 ते 40 वाड्या - वस्त्यांना मध्यवर्ती ठिकाण आहे. या धर्तीवर दिवंगत आमदार शंकर धोंडी पाटील यांनी 1992 - 93 च्या दरम्यान शासनाला प्रस्ताव सादर केला होता. त्याचा पाठपुरावा समाजवादी पार्टी मुंबईचे प्रदेश महासचिव शिवाजीराव परुळेकर यांनी चालू केला आहे. याची दखल घेऊन तालुका विभाजनाच्या अनुषंगाने निकष निश्चित करण्याबाबत विभागीय आयुक्त कोकण विभाग यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर समितीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्यामार्फत उपविभागीय अधिकारी आजरा - भुदरगड उपविभाग यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. उत्तुर स्वतंत्र तालुका झाल्यास या भागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रशासकीय आणि भौगोलिकदृष्ट्या येथील नागरिकांची सोय होणार आहे.

