जय भारत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केले होते आयोजन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील महागाव येथे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ) वतीने जय भारत इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींसाठी कराटे मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर पार पडले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर प्रशिक्षण शिबिर शिवसेनेच्या तालुका महिला संघटिका ॲड. स्नेहल पाटील यांनी आयोजित केले होते. यावेळी कराटे मार्गदर्शक अनिल राठोड यांनी मुलींना आत्मसंरक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवली. तसेच ॲड. स्नेहल पाटील यांनी 'मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न' यावर कायदेशीर मार्गदर्शन केले. जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आज मुलींना आत्मसंरक्षणासाठी कराटे सारख्या प्रशिक्षणाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास उपसरपंच संदीप कोकितकर, तालुका प्रमुख दिलीप माने, अखलाखभाई मुजावर, लक्ष्मण पाटील, अरुण कोकितकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सुकेशिनी कांबळे यांनी मानले.

.jpg)
.jpg)

.jpg)