Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवाजी विद्यापीठाच्या एम. कॉम. परीक्षेत गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयाचा ‘झेंडा’

शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत पहिल्या दहा पैकी चार विद्यार्थी





गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयाच्या एम.कॉम.च्या चार विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.




या गुणवत्ता यादीत प्रथमेश शशिकांत कोले (प्रथम), निकिता आप्पासो माने (पाचवा), मयुरी दादासो पाटील (नववा) तर सोनाली नारायण मटकर (दहावा) क्रमांक पटकाविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. या सर्व यशस्वितांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष  ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांचे प्रोत्साहन तर पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. महेश चौगुले, कॉमर्स विभाग प्रमुख डॉ. डी. पी. खेडकर, ग्रंथपाल संदीप कुराडे, रजिस्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.