Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा, रास्ता रोको, जेलभरो आंदोलन

सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र करू : बाळेश नाईक 


...तर येत्या विधानसभा निवडणुकीत सरकारला महिला जोरदार प्रत्युत्तर देतील : अंजना शारबिद्रे 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा, रास्ता रोको, जेलभरो आंदोलन करत आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य संघटक बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हजारो अंगणवाडी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.




लक्ष्मी मंदिरापासून या आंदोलनाची सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढत विविध घोषणा देत हे आंदोलन दसरा चौक या ठिकाणी आले. येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी मोठे रिंगण करत तिन्ही बाजूचे रस्ते अडविण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली.




यावेळी बोलताना बाळेश नाईक म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने ग्रॅच्युईटी देण्याचा आदेश केला आहे मात्र सरकारने त्याला केराची टोपली दाखवली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल असा इशारा त्यांनी दिला. अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्ष अंजना शारबिद्रे म्हणाल्या, अंगणवाडी सेविका सातत्याने आंदोलन करत शासनाकडे दाद मागत आहेत, मात्र शासन दुर्लक्ष करत आहे. शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत या सरकारला महिला जोरदार प्रत्युत्तर देतील.



या आंदोलनात तालुकाध्यक्ष राजश्री बावन्नावर, कार्याध्यक्ष सुरेखा गायकवाड, वंदना कांबळे, गीता भकरी, वंदना साबळे, पार्वती सुरंगे, भारती कुंभार, शोभा जाधव, जयश्री खानापुरे, रेणुका वरी, भारती येसरे, उदय कदम, अजिंक्य मोरे यांच्यासह अंगणवाडी सेविका  व मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर सोडून दिले.









Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.