गडहिंग्लज (प्रतिनिधी) : नेसरी येथील कन्या विद्यामंदिर शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. शितल पाटील तर उपाध्यक्षपदी गोपीचंद पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुजाता पाटील होत्या.
स्वागत रवळू पाटील यांनी तर प्रास्ताविक सुमन गवेकर यांनी केले. यानंतर प्रत्येक वर्गातून निवड झालेल्या उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन करत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सर्वानुमते अध्यक्षपदी शितल पाटील तर उपाध्यक्षपदी गोपीचंद पाटील यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विशाल पाटील, राजेंद्र सुभेदार, अमर कोरे, दिपक राजाराम, संध्या नाईक, शोभा भोसले, भारती नाईक यांच्यासह अन्य उपस्थित होते.

