सौ. मालुताई पाटील, सौ रेखा नाईक, मारुती गोडसे, मारुती घोलराखे, रानबा नाईक यांचा समावेश
जनार्दन पाटील व सुनील पाटील यांना 'समितीरत्न' पुरस्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा गडहिंग्लज पुरस्कृत डॉ.जे.पी. नाईक शैक्षणिक व्यासपीठामार्फत दरवर्षी शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या शिक्षकांना 'आदर्श शिक्षक' पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2023-24 सालासाठी सौ मालुताई दीपक पाटील देसाई (वि.मं.वैरागवाडी), सौ रेखा आप्पासाहेब नाईक (वि.मं. खणदाळ), मारुती आप्पा गोडसे. (वि मं आरळगुंडी), मारुती गणपती घोलराखे (वि. मं हुनगिनहाळ), रानबा सतबा नाईक (वि.मं. कुमरी) या शिक्षकांची नावे पुरस्कारासाठी जाहीर करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा गडहिंग्लज मार्फत संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल जनार्दन तुकाराम पाटील (विद्यामंदिर सुंदरनगर नेसरी) व सुनील संतराम पाटील (विद्यामंदिर हनीमनाळ) यांना 'समितीरत्न' पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
निवड समितीत सतीश तेली, रवळू पाटील, राजेंद्र नाईक, सिद्राम पाटील, दादासाहेब पाटील, दयानंद खतकर, रमेश पाटील, रामचंद्र सिताप, श्रीधर पाटील, तुकाराम जाधव यांनी काम पाहिले.

