Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पीसीओएस व्यवस्थापनासाठी योग्य आहार आणि व्यायाम महत्त्वाचा : डॉ. अंकिता गोडवे

कोल्हापूरच्या न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये विशेष व्याख्यानाचे आयोजन

       




कोल्हापूर : चुकीच्या आहारामुळे पीसीओएस (PCOS ) होऊ शकतो. चुकीच्या आहारामुळे हार्मोनल असंतुलन आणि वजन वाढते. पीसीओएस व्यवस्थापनासाठी योग्य आहार आणि व्यायाम खूप महत्त्वाचा आहे असे प्रतिपादन डॉ. अंकिता गोडवे यांनी केले.




कोल्हापूर येथील न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये पीसीओएस जनजागृती व फार्मसी सप्ताहाचे औचित्य साधून मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सप्टेंबर महिना हा पीसीओएस जनजागृती म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. गोडवे यांनी जंक फूड, जास्त फॅटी फूड, जास्त तेल, जास्त साखर, सुक्रोज इत्यादी पदार्थ टाळावेत. त्याऐवजी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा आहारात समावेश करावा असे सांगितले.



     

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व रोपट्यास पाणी घालून करण्यात आले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य रवींद्र कुंभार यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजाश्री पाटील यांनी केले. यावेळी 150 हून अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थिनींच्या शंकांचे निरसन करण्यात आले.



 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. पियुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के, प्रा. वैष्णवी निवेकर, प्रा. निकिता शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.