सांगली येथील कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील तब्बल ५०० छायाचित्रकारांचा सहभाग

सांगली : उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना गडहिंग्लजचे छायाचित्रकार आशपाक किल्लेदार.
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : सांगली येथील सन आर्ट स्टुडिओ यांच्या वतीने आयोजित फोटो, व्हिडीओ एक्स्पो 2024 या स्पर्धेतील उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार गडहिंग्लजचे छायाचित्रकार आशपाक किल्लेदार यांनी पटकाविला. श्रीमती संध्या जप्तीवाले, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत आर्किटेक्ट प्रमोद चौगुले व ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार चंद्रकांत धामणीकर यांच्या हस्ते पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील ५०० छायाचित्रकरांनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेचा इतर निकाल असा - जीवन गौरव पुरस्कार - कै. गिरीश मिस्त्री( मरणोत्तर, मुंबई), नवदुर्गा पुरस्कार- सौ. प्राजक्ता ऋषिकेश शिरगावे (कराड), उत्कृष्ट चाइल्ड फोटोग्राफी पुरस्कार - गणेश पांडुरंग म्हालदार (कोल्हापूर), अमर पाटील (तासगाव), महेश तावरे (सांगली), उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर पुरस्कार- ओंकार भोजने (जयसिंगपूर), अश्विन पाटील (मिरज), प्रथमेश कुलकर्णी (मिरज), उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (आशपाक किल्लेदार (गडहिंग्लज), पद्माकर खुरपे (कोरीची), साहिल शेकडे (बागणी), उत्कृष्ट कमर्शिअल फोटोग्राफी पुरस्कार - राकेश विलास रावळ (ठाणे), तौफिक शेख (कोल्हापूर), साहिल शेकडे (बागणी), उत्कृष्ट वेडिंग फोटोग्राफी पुरस्कार - प्रदीप गोनुगडे (कागल), दर्शन माळी, सुधीर पाटील उत्कृष्ट व्हिडिओ एडिटिंग पुरस्कार- शिव लंबे (वडगाव), प्रमोद मोरे (रत्नागिरी), प्रतीक जाधव (कामेरी), उत्कृष्ट रील पुरस्कार - निखिल महामुनी, रोहित जाधव, विक्रम स्वामी, उत्कृष्ट नेचर फोटोग्राफी पुरस्कार - शरद पाटील (कोल्हापूर), गौरी गांधी (मिरज), अनिकेत गुरव (कोल्हापूर) उत्कृष्ट वाईल्ड लाइफ फोटोग्राफी पुरस्कार- इम्रानखान पठाण (चंद्रपूर), डॉ. जितेंद्र कात्रे (सातारा), राकेश रावळ (मुंबई).
या स्पर्धेचे आयोजन संजय सारडा, श्रीराम जाधव, सुधीर कुदळे, अमित शाह यांनी होते. यावेळी रामकृष्ण सुर्वे, उदय देसाई, सचिन गायकवाड, सौ. राणी जमखंडीकर, संजय जगताप, किरण येळगावकर यांच्यासह इतर मान्यवर व छायाचित्रकार उपस्थित होते.
