Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संत गजानन शिक्षण समूह विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारी संस्था!

आमदार जयंत आसगावकर यांचे प्रतिपादन 


महागावच्या रुरल कॉलेज ऑफ पॅरामेडिकलमध्ये नवागतांचे स्वागत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार





गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव येथील संत गजानन महाराज शिक्षण समूहाची दगड विटांची इमारत ही केवळ बांधकाम नसून या ठिकाणी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम ही संस्था करत आहे. डोंगराळ भागात विविध अडचणींचा सामना करत येथे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण दिले जाते, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.




महागाव येथील येथील रुरल कॉलेज ऑफ पॅरामेडिकलमध्ये नवागतांचे स्वागत व बक्षीस वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्था सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण होते.




यावेळी विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, बाळकू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. श्रीकांत हेब्बाळकर यांनी केले.




यावेळी बोलताना आमदार आसगावकर पुढे म्हणाले, डोंगराळ भागात दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून संत गजानन महाराज शिक्षण समूहाची वेगळी ओळख आहे. या शैक्षणिक परिसरामध्ये पाच लाख स्क्वेअर फुटाचे बांधकाम आहे, ते केवळ दगडविटाचे नसून संस्कार देणारे केंद्र आहे. या संस्थेतून भविष्यात उपयोगी पडेल असे दर्जेदार शिक्षण देऊन परिपूर्ण करण्याचे काम केले जाते. शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी देश, विदेशात आपला व्यवसाय, नोकरी करत आहे. ६० टक्क्यापेक्षा अधिक मुली शिक्षण घेत आहेत. त्यामुळे मुलगी शिकली तर कुटुंब उभा राहते. संस्थेच्या प्रगतीमध्ये शिक्षकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रत्यक्ष ज्ञानावर भर दिला जातो. आज वैद्यकीय क्षेत्राची समाजाला फार मोठी गरज आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रामाणिकपणाने काम करा व संस्थेचे नाव मोठे करा. या संस्थेला आमदार म्हणून जे सहाकार्य लागेल ते देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन असे आश्वासन त्यांनी दिले.



यावेळी डॉ. यशवंत चव्हाण, बाळकु शिंदे, ॲड.बाळासाहेब चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. सतिश बंदी यांनी तर आभार प्रा. भाऊसाहेब आवळेकर यांनी केले. कार्यक्रमास प्राचार्य मंगल मोरबाळे, प्राचार्य रोहिणी पाटील, प्रा. विनायक काईंगडे, अजित भुईंबर, प्रकाश चौगुले यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.