एकाच टप्प्यात पार पडणार निवडणुका
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. आज पत्रकार परिषदेत केंद्रीय निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात एकूण 9 कोटी 3 लाख मतदार असून 1 लाख 186 मतदान केंद्र आहेत. 29 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख आहे. 30 ऑक्टोबरला छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची तारीख आहे. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

