गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथे महिलांना बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना संदर्भातील माहिती पुस्तिकेचे वाटप न्यू युवा मंचचे अध्यक्ष काशिनाथ गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.
राज्य शासन राज्यातील बांधकाम कामगारांना सुरक्षा कीट व संसारासाठी भांडी वाटप करत आहे. त्यामुळे नोंदणीकृत कामगारांना त्याचा मोठा फायदा होत आहे. तसेच शासन अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. याची माहिती कामगारांना व्हावी या हेतूने माहिती पुस्तक काढली आहे.
त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री सुरेश खाडे, प्रधान सचिव विनीता सींगल, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी कामगारांच्या योजनेबाबत लेख प्रसिद्ध केले आहेत. योजनेत किती प्रकारच्या योजना आहेत व त्यासाठी लागणारी कागदपत्रे आदी माहिती या पुस्तकात आहे. सदर पुस्तकाचे वाटप गडहिंग्लज येथील न्यू युवा मंचचे अध्यक्ष काशिनाथ गडकरी यांच्या हस्ते शहरातील पन्नास महीलांना करण्यात आले.
यावेळी संभाजी येरुडकर, श्रीशैल साखरे, साधना लोकरे, विशाखा घाणेकर, सुमन बागडी, रेखा कलावंत, मनीषा पाटील, सारीका कांबळे, शामल कलसानावर, प्रेमा सुतार, कवीता दळवी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

.jpg)