Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भारतीय सैन्यदल व पोलीस दलात निवड झालेल्या 55 विद्यार्थ्यांचा जल्लोषी मिरवणुकीने सन्मान

गडहिंग्लजला शिवराज महाविद्यालयाच्या वतीने आयोजन


'शिवराज' च्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद  : पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालय महाविद्यालयाच्या वतीने भारतीय सैन्यदल  व पोलीस दलात निवड झालेल्या 55 विद्यार्थी व पालकांचा सत्कार संपन्न झाला. सन्मानार्थ विद्यार्थी व पालकांची शहरातून वाजत-गाजत भव्य जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीची सुरुवात शिवराज महाविद्यालयातून करण्यात आली.



 

जल्लोषी रॅलीचे उदघाटन पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी संजय धुरे उपस्थित होते. या उदघाटनप्रसंगी पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले यांनी आपल्या भाषणातून शिवराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद असल्याचे सांगून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.




यावेळी संपूर्ण शहरातून वाजत-गाजत जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. संस्थेचे मान्यवर, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, खेळाडू, एन.सी.सी.कॅडेट मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष किसनराव कुराडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी संजय धुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक प्रा. जयवंत पाटील यांनी केले.  निवड झालेल्या 55 विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एम. कदम व मार्गदर्शक शिक्षक डॉ. राहुल मगदूम, प्रा. जयवंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला.


            

या कार्यक्रमात निवड झालेले विद्यार्थी हासन मुल्ला, तेजस चौगुले, अंकुश नादवडेकर, स्वागत पाटील, विष्णू माळी, पल्लवी जाधव, शुभम भेंडीगिरी, हर्षवर्धन खांडेकर, अनिकेत भिउंगडे, प्रतीक जाधव, संग्रामसिंह घाटगे, सूरज इंगळे, सिद्देश घेवडे, प्रवीण कागीनकर, सचिन होडगे, सुजल मोरबाळे, आशुतोष लोहार, मेघराज पाटील, सिद्धिविनायक महाडिक, यश वाळवे, अखिल तराळ, अदिनाथ गावडे, दिपक मगदूम, विशाल पाटील, मुरली शिंत्रे, ओंकार भोपळे, शंतनू नार्वेकर, आकाश शिंदे, प्रवीण बोरगावी, अनिकेत गिलबिले, सानिका कदम, विग्नेश पाटील, शुभम पोवार, प्रदीप कांबळे, पायल जांभळे यासह 55  यशस्वी विद्यार्थ्यांच्या व पालकांचा सत्कार मान्यवराच्या हस्ते करण्यात आला.




शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी आजचा हा सत्कार ऐतिहासिक आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वतःच्या मेरिटवर सिलेक्ट होत आहेत. क्रीडा विभाग व महाविद्यालयाच्या सर्व प्रशासकीय कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून हे सर्व होत आहे. दरवर्षी शिवराजचे शेकडो विद्यार्थी निवड होत आहेत. हे आम्हाला अभिमानास्पद आहे. असेच प्रेरणादायी कार्य विद्यार्थ्यांनी करावे असे प्रतिपादन केले. सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी शिवराजची यशस्वी गाथा सुवर्ण अक्षरांनी लिहावे असे कार्य विद्यार्थ्यांनी केले आहे. क्रीडाशिक्षक प्रा. आनंदराव नाळे यांनी महाविद्यालयाची ही क्रीडा परंपरा सुरु केली आहे.  तर क्रीडा शिक्षक डॉ. राहुल मगदूम व प्रा. जयवंत पाटील यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली आहे.  खेळाडू घडविले आहेत. विद्यार्थांनी देशाची सेवा करताना आई वडील, मातृभूमी, देश सेवेत हुतात्मा झालेल्यांचे स्मरण करावे असे प्रतिपादन केले.



पालक सुभाष गावडे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. निवड झालेल्या विदयार्थ्यांनी अधिकारी पदावर पोहचण्यासाठी जिद्द सोडू नका, त्याकरिता प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी माजी विद्यार्थी संजय धुरे यांनी शिवराजीयन असल्याचा मला अभिमान वाटतो. शिवराजच्या संस्कारातून अनेक विद्यार्थी घडत आहेत. हे खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सुरेश मोरबाळे यांनी मनोगत व्यक्त केले.



 

यावेळी उपाध्यक्ष पाटील श्री के.जी. पाटील, ॲड. दिग्विजय कुराडे, संचालक बसवराज आजरी, संचलिका प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, संचालक प्रा.विश्वजित कुराडे , पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, रजिष्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, एन. सी. सी. कडेट आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अशोक मोरमारे यांनी केले. आभार प्रा. डॉ. राहुल मगदूम यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.