Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

माजी आमदार बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या

दोघा हल्लेखोरांना अटक, एकजण पसार




मुंबई : माजी आमदार व अजितदादा पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची वांद्रे खेरवाडी सिग्नलजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेनंतर जखमी झालेल्या सिद्दिकी यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघा हल्लेखोरांना अटक केली असून एक जण फरार आहे. या घटनेत हल्लेखोरांनी दोन ते तीन राऊंड गोळ्या झाडल्या असून दोन गोळ्या सिद्धीक यांच्या पोटाला लागल्या आहेत.



बाबा सिद्दिकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देऊन अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. 1999, 2004  व 2009 मध्ये ते आमदार होते. काँग्रेस सरकारच्या काळात मंत्री पदाची धुरा देखील त्यांनी सांभाळली होती. बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव जीशान सिद्दिकी वांद्रे पूर्व मतदार संघाचे आमदार आहेत. या घटनेने मुंबईत खळबळ उडाली असून पोलिसांचा तपास गतीने सुरू आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.