गडहिंग्लज (प्रतिनिधी): बी. एम. टोणपी मराठी विद्यालयामध्ये जागतिक अंडी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्या शुक्रवारी जागतिक अंडी दिन साजरा केला जातो. यावेळी विद्यालयात पालक विकास विजयकुमार पाटील यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना अंडी वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिव सौ. अर्चना टोणपी, मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.

