Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चंदगड, कागल, राधानगरी विधानसभा मतदारसंघात जास्तीत जास्त युवासेना सदस्य नोंदणी करणार !

युवा सेनेचे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अधिकारी अवधूत पाटील यांचा निर्धार 


गडहिंग्लजला युवासेना सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ




गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड, कागल, राधानगरी विधानसभा मतदारसंघात युवा सैनिकांच्या सहकार्याने जास्तीत जास्त युवासेना सदस्य नोंदणी करून पक्ष संघटना बळकट करण्याचा निर्धार ठाकरे पक्ष शिवसेना युवा सेनेचे कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अधिकारी अवधूत पाटील यांनी केला आहे.




शिवसेना युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसा निमित्त पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव अविनाश बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर - बेळगाव जिल्हा विस्तारक डॉ.सतीश नरसिंग यांनी आयोजन केलेल्या युवासेना सदस्य नोंदणी 2024 अभियान फलकाचे अनावरण  शिवसेना युवासेना शाखा दसरा चौक, बस स्टँड येथे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, युवासेना कोल्हापूर जिल्हा ग्रामीण अधिकारी अवधुत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.



यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अजित खोत, दिलीप माने, युवासेना तालुका प्रमुख सागर हेब्बाळे, उपजिल्हा समन्वयक बाबुराव नाईक, अरुण रेडेकर, युवासेना आजरा तालुका प्रमुख रोहित डावरे, युवासेना चंदगड तालुका प्रमुख किरण नागुर्डेकर, शिवसेना उपशहर प्रमुख संदीप चव्हाण, युवासेना उपतालुका प्रमुख विशाल चव्हाण, युवासेना आजरा तालुका चिटणीस शकील मुल्ला, शहर समन्वयक तेजस घेवडे, संदीप केसरकर, विभाग प्रमुख भरमु बिर्जे व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


व्हिडिओ येथे पहा 👇👇






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.