Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णीत श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात

संस्थेच्या उत्कृष्ट कामगिरीचे उपस्थित मान्यवरांकडून कौतुक





गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथे श्री बिरेश्वर को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखेचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी सरपंच भीमाप्पाना शिखरी होते.




प्रारंभी संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी, माजी खाजदार अण्णासाहेब जोले यांच्या 62 व्या जन्मदिनानिमित्त हलकर्णी शाखेतर्फे शुभेच्छा ठराव मांडण्यात आला. स्वागत के. बी. पाटील यांनी केले. प्रास्ताविकात उद्योजक शिवकुमार संसुध्दी यांनी संस्थेच्या वर्षभरातील यशस्वी वाटचालीची माहिती दिली. वर्षभरात सुमारे 631 सभासदांनी नोंदणी करत तीन कोटी 60 लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्याचे सांगितले. 117 बचत गटांना सुमारे 24 लाख 55 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देऊन महिला सक्षमीकरणाला चालना दिल्याचे सांगितले.




यावेळी बुगडीकट्टी गावचे सरपंच दयानंद देसाई यांना राजर्षी शाहू आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेमार्फत किरण संघाज व सदाशिव मठपती यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी जयकुमार मुन्नोळी यांनी कमी कालावधीमध्ये संस्थेकडून दर्जेदार कामगिरी झाल्याचे नमूद करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. दयानंद देसाई यांनी मनोगत व्यक्त केले.



                     

यावेळी डॉ. संजय धबाले, नितीन मुंगुरवाडी, उदय जांगनुरे, भीमाप्पा नंदनवाडे गुरुजी, सुरेश अंकली, इराय्या हिरेमठ, विजय लोहार, सुहास कुंभार, अल्लीसो कादरभाई, सलीम ताशिलदार, विजय मुंगुरवाडी, प्रसाद जोशी, अमरदीप व्हसकोटी, महांतेश मुंगुरवाडी, राजू सकुंडे, अल्ताफ मुल्ला, गैबीसो कोनकेरी, मुरलीधर गुरव, शिवाजी कुराडे, सुनील चौगुले, राजेंद्र कब्बूरी, राजेंद्र नावलगी यांच्यासह ग्रामस्थ, व्यापारी, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. शाखाधिकारी बाहुबली पाटील यांनी आभार मानले.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.