Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

येणेचवंडीची कन्या झाली तालुका कृषी अधिकारी

हेमलता इंगळे हिचे अमरावती जिल्ह्यात नियुक्ती


राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून मिळवले होते यश 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील येणेचवंडी येथील हेमलता प्रकाश इंगळे हिची तिवसा (जि.अमरावती) येथे तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा परीक्षेतून तिने हे यश मिळवले होते. 



हेमलता हिने सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ९७ वी तर मुलींमधून २१ वा क्रमांक मिळवत उज्वल यश मिळवले होते. तिचे प्राथमिक शिक्षण गडहिंग्लज येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात असून कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण एम. आर. हायस्कूल येथे झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील उद्यान महाविद्यालयातून  हॉर्टिकल्चर विषयातून तिने बीएससी पदवी मिळवली. त्यानंतर राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून व्हेजिटेबल सायन्स मधून तिने एमएससी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण केले आहे. हेमलताच्या निवडीने येणेचवंडी गावचा नावलौकिक झाला आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.