Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुक्यात शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या वाढविणे गरजेचे !

गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांचे प्रतिपादन 


गडहिंग्लज हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती कार्यशाळेचे आयोजन 


कार्यशाळेत १२७ शिक्षकांचा सहभाग



गडहिंग्लज : येथे कार्यशाळेत बोलताना गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ. सोबत शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. जाधव. 


गडहिंग्लज (प्रतिनिधी): जिल्ह्यात गडहिंग्लज तालुका सर्व बाबतीत एक ते तीन नंबरमध्ये आहे, पण  शिष्यवृत्ती परीक्षेत इतर तालुक्याच्या मानाने फारच मागे आहे. त्यासाठी मार्गदर्शक शिक्षकांनी  शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी संख्या वाढवणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी केले.




गडहिंग्लज येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्यावतीने पाचवी व आठवी शिष्यवृत्ती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. जाधव यावेळी उपस्थित होते.

      


गटशिक्षणाधिकारी श्री. हालबागोळ म्हणाले, प्रत्येक शाळेने शिष्यवृत्ती, राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या मागास शिष्यवृत्ती, क्रीडा स्पर्धा यासह इतर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळा समृद्ध करून गुणवत्ता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मनावर संस्कार करून शाळेविषयी गोडी निर्माण करणे ही शिक्षकांची जबाबदारी आहे. शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थी पात्र होऊन राज्य गुणवत्ता यादीत येण्यासाठी वर्षभराचे वेळापत्रक तयार करून अभ्यासक्रम वेळत पूर्ण करत आठवड्यात किमान एक सराव परीक्षा घेणे गरजेचे आहे असा सल्लाही दिला.

    


या कार्यशाळेत आठवी शिष्यवृत्तीसाठी एस. व्ही. चोथे, सुहास पुजारी, प्रकाश देशपांडे, पद्मश्री गुरव तर पाचवी शिष्यवृत्तीसाठी पंडीत सुतार, समीर कुलकर्णी, वृषाली साबळे, सविता सासुलकर यांनी साधनव्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले.




या कार्यशाळेत तालुक्यातील माध्यमिक विभागातील ५७ व प्राथमिक विभागातील ७० असे १२७ शाळेतील शिक्षकांनी सहभाग घेतला. कार्यशाळेत शिक्षकांनी विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन साधन व्यक्तीने केले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.