Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विविध क्रीडा क्षेत्रात निवड झालेल्या खेळाडूंचा गडहिंग्लजला सत्कार

जय जवान जय किसान फौंडेशनच्या  वतीने आयोजन 


सन्मान चिन्ह देत दिल्या शुभेच्छा 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज येथील आजी-माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित-जय जवान जय किसान फौंडेशनच्या वतीने क्रीडा क्षेत्रात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करत शुभेच्छा देण्यात आल्या.




यावेळी न्यू हॉरीझन स्कूल औरनाळचे विद्यार्थी U-14 हॉलीबॉल नॅशनल चॅम्पियन स्पर्धेसाठी कसोली हिमाचल प्रदेश येथे जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या. नॅशनल स्पर्धेत 1500 मीटर गोल्ड मेडल व 800 मीटर ब्रॉन्झ मेडल मिळवलेल्या अनुज मारुती पाटील याचा सत्कार, जिल्हा फुटबॉल संघात खेळणाऱ्या केतकी रविंद्र कोंडस्कर हिला शुभेच्छा, नॅशनल जिमनॅस्टीक खेळाडू निखील चंद्रकांत लष्करे याचा सत्कार करण्यात आला.



मांगलेवाडी येथील फळ व भाजीपाला  विकणाऱ्या महादेव कुंडले यांची कन्या कु. आरती महादेव कुंडले हिची कर सहाय्यक पदी नियुक्ती झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आले.




यावेळी भरत येल्लुरे, चंद्रकांत लष्करे, सुभाष गावडे, बळवंत ढेकळे, जयवंत नगरे, पांडुरंग देसाई, भरत जाधव, जयवंत खोराटे, अध्यक्ष कुमार पाटील यांच्यासह औरनाळ संघटना अध्यक्ष बाळासाहेब भोसले, गणपती सावंत, ईश्वर मोरे उपस्थित होते.



दरम्यान, यावेळी आजी-माजी सैनिक संघटना औरनाळ यांना आजी-माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित-जय जवान जय किसान फौंडेशन गडहिंग्लजच्या उपशाखेचे पत्र अध्यक्ष कुमार पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.