Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

लाचखोर पोलीस हवालदार रविकांत शिंदे याला लाच घेताना रंगेहात पकडले

गुटखा विक्रीसाठी दुकानदाराला महिन्याला चार हजार रुपयांचा मागितला होता हप्ता 


१६ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई





कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील किराणा दुकानदाराला गुटखा विक्रीचा गुन्हा दाखल करण्याची भिती घालत लाचेची मागणी करून ती स्विकारताना पोलीस हवालदार रविकांत भैरू शिंदे (वय ५०, रा. पाचतिकटी, हातकणंगले, मूळ गाव फणसवाडी, ता. भुदरगड) याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. त्याच्या विरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.




याबाबतची अधिक माहिती अशी की कुंभोज येथील किराणा माल दुकानदाराला 'तु गुटखा विक्री करतोस तुझ्यावर गुन्हा दाखल करतो' अशी भिती पोलीस हवालदार  रविकांत शिंदे याने घातली. याबदल्यात दुकानदाराकडे त्याने 10 हजार रुपयांची लाच मागितली. गेली एक महिना शिंदे याच्याकडून त्या दुकानदाराला त्रास सुरू होता. या त्रासाला कंटाळून दुकानदाराने चर्चा करून शिंदे याच्याशी तडजोड करत महिना चार हजार रुपयांचा हप्ता देण्याचे ठरले. दरम्यान, त्यानंतर दुकानदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. याबाबत लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करून घेत खात्री केली. 


आज (शुक्रवार) दुकानदार ४ हजार प्रमाणे ठरलेली एकूण चार महिन्याचे १६ हजार रुपये घेऊन पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी शिंदे याच्याकडे ठाणे अंमलदार म्हणून डायरीचा चार्ज होता. यावेळी पोलीस ठाण्यात कमी वर्दळ असल्यामुळे हे पैसे हवालदार शिंदे याने स्वीकारले. याचवेळी येथे सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने हवालदार शिंदे याच्यावर झडप घालून १६ हजार रुपयांची लाच स्विकारताना याला रंगेहाथ पकडले. 



ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  उपअधीक्षक श्रीमती वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बापू साळुंखे, हवालदार सुनिल घोसाळकर, संदिप काशिद, सचिन पाटील, संदिप पवार यांच्या पथकाने केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.