स्वतः तयार केलेले आयुर्वेदिक उटणे, पणत्या, आकाश कंदील बाल संकुलाकडे सुपूर्द
कोल्हापूर : येथील न्यू वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसीने दीपावली निमित्त आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले होते. कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वतः उटणे तयार केले व त्याचे वाटप बालसंकुलातील मुलांना केले.
गतवर्षीप्रमाणे यावर्षीही न्यू वूमन्सच्या विद्यार्थिनींनी स्वतः आयुर्वेदिक उटणे तयार केले व दीपावलीनिमित्त उटणे, पणत्या व आकाश कंदील बालसंकुलातील मुला मुलींसाठी संस्थेकडे सुपूर्त केले. सदर उपक्रमासाठी प्रा. वैष्णवी निवेकर, प्रा. निकिता शेटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी प्रा. पियुषा नेजदार, प्रा. दिव्या शिर्के तसेच जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना, कोल्हापूर यांचे मानद कार्यवाह श्रीमती पद्मजा तिवले, कदम, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सदरचा उपक्रम कॉलेजचे प्राचार्य रवींद्र कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बी.जी. बोराडे, चेअरमन के.जी. पाटील, व्हा.चेअरमन डी.जी. किल्लेदार, खजानीस वाय. एस. चव्हाण यांनी विशेष कौतुक केले.


