गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी बस स्थानकाच्या समोरील व पाठीमागील सर्व परिसरातील राष्ट्रीय सेवा योजनेचे व राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक यांनी परिसर स्वच्छता केली. या स्वच्छता मोहिमेत आगार व्यवस्थापक गुरुनाथ रणे व वरिष्ठ लिपिक अजित अकोलकर, सुधाकर व्यवहारे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. जी. गायकवाड डॉ. डी.पी खेडकर, डॉ.एस.डी.सावंत, प्रा.डी.यू.जाधव, डॉ.आर.डी.मगदूम व कनिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. संजय कांबळे व राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते. ही स्वच्छता मोहिमेस राबविण्यासाठी महाविद्यालयाचे व संस्था सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ एस.एम.कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

