Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हलकर्णी महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर पदभरती

रविवारी होणार महाविद्यालयात मुलाखती 


संस्थाध्यक्ष एम.जी. पाटील यांची माहिती 




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथे नव्याने सुरू केलेल्या कायम विना अनुदान तत्वावरील हलकर्णी महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर पदांची भरती करण्यात येत आहे. सदर पदांसाठी रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुलाखती पार पडणार आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष एम. जी. पाटील यांनी दिली आहे.



गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील हलकर्णी परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनींची गरज ओळखून त्यांच्या सोयीसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्नित  व तांबाळेश्वर शिक्षण संस्था संचलित हलकर्णी महाविद्यालय हलकर्णी नव्याने सुरू करण्यात आले आहे. येथील बसस्थानकानजीक तेरणी रोडवरील अंकली बिल्डिंगमध्ये जान्हवी क्लिनिकलगत सदर महाविद्यालय सुरू केले आहे. या महाविद्यालयासाठी या भागातील विद्यार्थी व विद्यार्थिनीकडून चांगला प्रतिसाद लाभत आहे.


शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२४- २५ करिता पदभरतीस मान्यता मिळाल्या नुसार स्थानिक निवड समितीमार्फत तात्पुरत्या स्वरूपात ही शिक्षक व शिक्षकेतर पद भरती करण्यात येत आहे.  प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल सहाय्यक, शिपाई आदी पदभरती केली जात आहे. सर्व पदांसाठी  रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयात मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून महिला, मागासवर्ग व दिव्यांग उमेदवारांनाही प्राधान्य राहणार आहे. सदर पदभरती संदर्भात दिनांक 30 सप्टेंबर रोजी वृत्तपत्रांमध्ये सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष श्री. पाटील यांनी दिली. अधिक माहितीसाठी  संस्था अध्यक्ष एम. जी. पाटील 9604136181, इंद्रजीत पाटील 8698991349 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.