Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज येथील आशीर्वाद कॉमर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे यश

प्रांजल शिंत्रे सीए इंटरमेडीयट तर दर्शन कदम सीए फौंडेशन परीक्षा उत्तीर्ण





गडहिंग्लज (प्रतिनिधी): द इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड  अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्याकडून घेतल्या गेलेल्या सीए इंटरमेडीयट आणि सीए फौंडेशन या परीक्षेमध्ये गडहिंग्लज येथील आशीर्वाद कॉमर्स अकॅडमीच्या  विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.



यामध्ये प्रांजल शिंत्रे हिने सीए इंटरमेडीयट ही परीक्षा पास होऊन सीए फायनलमध्ये प्रवेश केला, तर दर्शन कदम याने सीए फौंडेशन ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन इंटरमेडीयटमध्ये प्रवेश केला. ही परीक्षा आपल्या देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणून ओळखली जाते. गडहिंग्लजसारख्या ठिकाणी राहून सुद्धा या परीक्षा सहज पास होता येतात हे या मुलांनी पुन्हा एकदा सिद्ध केले.



आतापर्यंत आशीर्वाद कॉमर्स अकॅडमीचे 72 हून जास्त विद्यार्थी हे CA Foundation, CA CPT, CS Foundation, CSEET या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, नऊ विद्यार्थी CA Intermediate उत्तीर्ण असून, सहा विद्यार्थी CA Final करत आहेत.




यासाठी क्लासचे संचालक अमित कुलकर्णी, महावीर मरजे, सौ. मेघा गिजवनेकर, सौ. प्रिया कुलकर्णी, सुशांत येजरे, सौ. अपर्णा पाटील, सौ. अनिसा नंदिकर, प्रतिक कुंभार, दिशा गुंजाटे यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.