६० टक्के घरफाळा व पाणीपट्टी वसुली
संजय मांगले यांनी मिळविला प्रथम क्रमांक
गडहिंग्लज (प्रतिनिधी): घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी नौकुड ग्रामपंचायतकडून राबविण्यात आलेल्या लकी ड्रॉ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला गावातील मिळकतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये संजय मांगले याने प्रथम क्रमांक पटकाविला. चाळोबा मांगले द्वितीय, नंदा पाटील तृतीय, आप्पासो चव्हाण चौथा तर रामू पाटील यांनी पाचवा क्रमांक पटकावला.
भव्य लकी ड्रॉ ऑफर १ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबरपर्यंत चालू होती. यामध्ये जे मिळकातदार आपला घरफाळा व पाणीपट्टी भरतील, त्यामधील लकी ड्रॉ पद्धतीने एक ते पाच नंबर काढण्यात आले. तसेच जे मिळकतदार आपला घरफाळा व पाणीपट्टी भरले आहेत, पण ज्यांचे नंबर आले नाहीत पण जे आपला घरफाळा व पाणीपट्टी भरले आहेत त्यांना देखील खास आकर्षक भेटवस्तू देण्यात आले.
मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर या लकी ड्रॉ ऑफर सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक श संजय लक्ष्मण मांगले यांचा आला. त्यांना पाच किलो साखर, दोन किलो रवा, तेल एक किलो, हरभरा डाळ एक किलो, तसेच आकर्षक भेटवस्तू यामध्ये २०२५ वर्षाचे महालक्ष्मी दिनदर्शिका देण्यात आले.
द्वितीय क्रमांक चाळोबा सखाराम मांगले यांचा आला. त्यांना चार किलो साखर, एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ, एक किलो तेल, आकर्षक भेटवस्तू यामध्ये २०२५ वर्षाचे महालक्ष्मी दिनदर्शिका देण्यात आले.
तृतीय क्रमांक सौ.नंदा नेताजी पाटील यांचा आला. त्यांना तीन किलो साखर, एक किलो रवा, एक किलो हरभरा डाळ, एक किलो तेल आकर्षक भेटवस्तू यामध्ये २०२५ वर्षाचे महालक्ष्मी दिनदर्शिका देण्यात आले.
चौथा क्रमांक आप्पासो बैजू चव्हाण यांचा आला. त्यांना दोन किलो साखर, एक किलो तेल, एक किलो हरभरा डाळ, एक किलो रवा,तसेच आकर्षक भेटवस्तू यामध्ये २०२५वर्षाचे महालक्ष्मी दिनदर्शिका देण्यात आले.
पाचवा क्रमांक रामू आप्पा पाटील यांचा आला. त्यांना एक किलो साखर, एक किलो हरभरा डाळ ,तेल एक किलो रवा तसेच आकर्षक भेटवस्तू यामध्ये २०२५ वर्षाचे महालक्ष्मी दिनदर्शिका देण्यात आले.
इतर सर्व मिळकतदारांना ग्रामपंचायत कडून आकर्षक भेटवस्तू यामध्ये २०२५ वर्षाचे महालक्ष्मी दिनदर्शिका देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विजय जाधव यांनी माहिती दिली. यामध्ये ग्रामपंचायतीकडून राबविण्यात आलेला अभिनव उपक्रम दसरा व दिपावली निमित्त भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये या कालावधीत दोनशे सव्वा दोनशे मिळकतदारानी आपला घरफाळा व पाणीपट्टी भरले व यामधून तीन लाख रुपये जमा झाले.
व सर्व मिळकतदारानी आपला घरफाळा व पाणीपट्टी भरून सहकार्य केल्याबद्दल सर्व मिळकतदराचे आभार मानले. तसेच अशी आपली नौकुड ग्रामपंचायत ही तालुक्यामध्ये एकमेव ग्रामपंचायत आहे .जी आपली घरफाळा व पाणीपट्टी वसुली दिपावली मध्ये ६० टक्के केली आहे.असे त्यांनी सांगितले.
सरपंच शुक्राचार्य चोथे यांनी आपल्या मनोगतात ग्रामपंचायतीकडून गावामध्ये राबविण्यात आलेला हा अभिनव उपक्रम आहे. दसरा व दिपावली निमित्त भव्य लकी ड्रॉ ऑफर यामध्ये गावातील दोनशे ते सव्वा दोनशे मिळकतदारानी आपला घरफाळा व पाणीपट्टी भरली आहे.यातून जवळजवळ ६० टक्के वसूली झाली आहे.या ऑफरमधून 3 लाख रुपये जमा झाले आहेत असे सांगून त्यांनी सर्व मिळकतदारांचे आभार मानले. तसेच ग्रामपंचायतीकडून गावामध्ये राबविण्यात येणाऱ्या योजना, उपक्रम याची माहिती दिली.
यावेळी विजय गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतातून ग्रामपंचायतकडून गावामध्ये राबविण्यात आलेला हा अभिनव उपक्रम यांची माहिती दिली. केरबा बिरंजे यांनी ग्रामपंचायतीने राबविलेल्या या यशस्वी उपक्रमाचे कौतुक केले. जयवंत बिरंजे यांनी ग्रामपंचायत माध्यमांतून राबविण्यात आलेल्या योजना, विकास कामे अभिनव उपक्रम यांचे कौतुक केले. सचिन गोडसे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरपंच शुक्राचार्य चोथे, उपसरपंच सौ. रेखा सरदेसाई, ग्रामपंचायत अधिकारी विजय जाधव, ग्रामपंचायत सदस्या सौ. हिराबाई चौगुले, सौ.सुवर्णा गोसावी, श्रीमती सुरेखा गुरव, सदस्य विजय गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष सखाराम केसरकर, देवस्थान समिती सेक्रेटरी संजय डवरी केरबा गोईलकर, माजी सैनिक मधुकर चव्हाण, संभाजी चौगुले, शिवाजी मांगले, भालचंद्र गोडसे,सचिन गोडसे, जीवना बिरंजे, कर्मचारी विनोद चोथे, रमेश पाटील, शंकर कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.










