Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवरायांचे विचार रुजवण्याची २४ वर्षाची धडपड

उत्तूरच्या निर्मिती मंडळाच्यावतीने किल्ला स्पर्धा व दुर्गभ्रमंती



आजरा (प्रतिनिधी):
बालवयातच शिवविचार रुजावेत आणि सुसंस्कार पिढी घडावी यासाठी उत्तूर येथील निर्मिती युवा परिवार आणि मुकुंदरावदादा आपटे फौंडेशनने दिवाळीत किल्ले स्पर्धा व दुर्ग भ्रमंती आयोजित केली आहे. उपक्रमात चे हे २४ वे वर्ष आहे.  या दिवाळीत अवचितगडाची प्रतिकृती बनवण्यासाठी मुलांची धडपड सुरू आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांना गगनगडाची भ्रमंती मंडळातर्फे घडवली जाणार आहे. 

     


दिवाळी आली की दगड, माती, विटा गोळा करायच्या. त्या एखाद्या भिंतीला लावायच्या. त्यावर चिखल थापायचा की झाला किल्ला तयार. हे उत्तूरमधलं याआधीचे चित्र. पण आता तसे होत नाही. हे चित्र अखंड धडपडीमधून बदलेलं आहे. निर्मिती परिवार व मुकुंदरावदादा आपटे फौंडेशनच्या वैशीष्टयपूर्ण किल्ला स्पर्धा व गडभ्रमंतीमुळे. आता मुले इंटरनेटवरून किल्ल्याचा नकाशा शोधतात. माहिती घेतात. संपूर्ण उत्तूरमधे सर्व ठिकाणी एकच गड केला जातो. यासाठी सर्व बालचमूला पालक आवर्जून मदत करतात. परीक्षणवेळी मुले अक्षरशः शिवशाही उभी करतात. पोवाडे गातात, ऐतिहासिक नाट्यछटा सादर करतात. स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बक्षीस वितरण हे एखाद्या गडावरच होते. या ठिकाणी इतिहास तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली गडभ्रमंती होते. स्वच्छता केली जाते. ऐतिहासिक व्याख्यान होते. अशा नानाविध वैशिष्ट्यमुळे ही स्पर्धा एक संस्कारवर्ग बनली आहे.


 बक्षीस वितरण गगनगडावर


कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश किल्ल्यासह रायगड, प्रतापगड, सज्जनगड किल्ल्यावर स्पर्धेतील सहभागी मुलांना त्यांच्या मातांसह भ्रमंती घडवून आणणारे निर्मिती आणि आपटे फौंडेशन महाराष्ट्रातील एकमेव मंडळ असावे. स्पर्धेचे बक्षीस वितरण गगनगडावर होणार आहे.किल्ला करण्यासाठी चिखल - मातीत हात राड झाल्याशिवाय व दुर्ग भ्रमंती केल्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज कळत नाहीत. त्यासाठीच शिवसंस्कार घडवण्यासाठी हा खटाटोप सुरू असल्याचे मंडळाचे सचिव चंद्रशेखर आमनगी यांनी सांगितले.


 

ही घ्या काळजी👇


किल्ला तयार करताना सुरक्षितता महत्त्वाची आहे. विहीर, तलाव यांच्या काठावर तसेच विजेचे पोल, वीज वाहिन्या यांच्या खाली किल्ला तयार करू नये, विद्युत पुरवठा अधिकृत घ्यावा, शिवाय चार फुटापेक्षा जास्त किल्याची उंची नसावी यासारख्या काही मार्गदर्शक सूचना केल्या असल्याची माहिती निर्मितीचे मंडळाचे अध्यक्ष महादेव मिसाळ यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.