कोल्हापूर : काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, उद्योजक सत्यजित जाधव यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार जयश्री जाधव यांची शिवसेनेच्या उपनेत्या या पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक उपस्थित होते.

