Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'साप्ताहिक गडहिंग्लज प्रगती'च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन उत्साहात

प्रगती परिवारामार्फत विविध मान्यवरांचा सत्कार





गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथे 'साप्ताहिक गडहिंग्लज प्रगती'च्या २४व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन  गोकुळ दूध संघाचे माजी संचालक बाळासाहेब पाटील-औरनाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुडचे  प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.



माध्यमिक पतसंस्थेचे अध्यक्ष डी.व्ही.चव्हाण यांनी प्रास्ताविक केले   संपादिका सौ. प्रतिभा देशपांडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तर प्रगतीचे संस्थापक संपादक दत्ता देशपांडे  यांनी गेल्या २४ वर्षातील साप्ताहिक प्रगतीचा आढावा घेतला.



यावेळी प्रगती परिवारामार्फत उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मुखपृष्ठावर छायाचित्र दिलेल्या कु.अवंतिका रोहन कुलकर्णी, प्रा. सुभाष कोरे, पी.एच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल प्रा. पी. डी. पाटील यांचा तसेच होमिओपॅथीमध्ये एम.डी. पदवी  संपादन केल्याबद्दल डॉ. सोमेश देशपांडे, राजेंद्र खोराटे, बी. जी. काटे, स्वप्नज  बांदेकर, आप्पा बागे, श्रीमती हौसाबाई परीट, आण्णाप्पा खुडे , सौ. रेखा पोतदार, हरळी बुद्रुक पोलीस पाटील श्रीमती रेणुका परीट, के.डी. धनवडे यांच्यासह नवोदित लेखक, कवी यांचा भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



यावेळी प्रा .सुभाष कोरे, योग शिक्षक राम पाटील, बी.जी. काटे, प्राचार्य शिवाजीराव होडगे यांची भाषणे झाली. बाळासाहेब पाटील यांचे  अध्यक्षीय भाषण झाले. कार्यक्रमास बी. जी. स्वामी,  ज्योतिष तज्ञ सुरेश बसर्गेकर, प्रकाश इंगळे, संपत सावंत, जी डी. कोकितकर, श्रीपाद स्वामी, शशिकांत मोहिते, टी.एम. दुंडगे,  रावसाहेब मुरगी, राजेंद्र शेलार, सुरेंद्र बांदेकर, अविनाश कुलकर्णी, प्रणिता कुलकर्णी, निळकंठ कुराडे, वाय. बी. कुलकर्णी, अनिल चव्हाण, रोहन कुलकर्णी, राजेंद्र कोरवी, अमृता कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, कुंभीरकर उपस्थित होते. सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले तर विठ्ठल चौगुले यांनी आभार मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.