Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लजला अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेची तयारी जोरात

युनायटेड चषक फुटबॉल स्पर्धा ;  मैदानाभोवती लोखंडी कठडे 


रोलरने सपाटीकरण, लोकवर्गणीची पंरपंरा


'गडहिंग्लजची फुटबॉल जत्रा' म्हणून स्पर्धेचा देशभर लौकिक 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत मंगळवारपासून (दिनांक ५) होणाऱ्या अखिल भारतीय फु़टबॉल स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात आली आहे. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर लोखंडी कठडे उभारण्याचे काम पुर्ण झाले आहे. दोन दिवसापासून मैदानावर फुटबॉलपटूंनी श्रमदानातून बुजवलेल्या खड्ड्यांवर  माती टाकली आहे. मातीच्या भरावावर पाणी मारून सपाटीकरण केले जात आहे. लोकवर्गणीतून होणाऱ्या या फुटबॉल स्पर्धेचे यंदाचे एकोणीसावे वर्ष आहे.





साठच्या दशकापासून याठिकाणी दिवाळीत फुटबॉलच्या स्पर्धा होतात. 'गडहिंग्लजची फुटबॉल जत्राच' म्हणूनच या स्पर्धेचा देशभर लौकिक आहे. महाराष्ट्रासह लगतच्या कर्नाटक, गोवा येथील संघ दरवर्षी या जत्रेत गडहिंग्लजच्या फुटबॉलप्रेमाला सलाम करण्यासाठी आवर्जून हजेरी लावतात. सुरवातीला अजित क्रीडाने सुरु केलेली ही दैदिप्यमान पंरपंरा युनायटेडने गेल्या दोन दशकापासून जपली आहे. कोणताही पुरस्कर्ता नसताना लोकवर्गणी आणि भोजनासाठी धान्य संकलनाद्वारे  ग्रामीण भागात मुलभूत सोयी सुविधांचा अभाव असतानाही स्पर्धेचे नेटके संयोजन केले जाते. दोन महिन्यापासून स्पर्धेची तयारी सुरु आहे. स्पर्धेच्या खर्चात बचत व्हावी या उद्देशाने खेळाडूच पडेल ते काम करून काटकसकर करत असतात. परराज्यातील संघाना निंमत्रण, देणगीचे संकलन करण्यासह मैदानाची दुरुस्ती करण्यासाठी खेळाडूंची धावपळ सुरु आहे. मैदानाभोवती लोखंडी कठडे उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. रोलरने सपाटीकरणाचे काम सुरु आहे. प्रेक्षक गॅलरीची स्वच्छता करण्यात आली आहे. निवास आणि भोजन व्यवस्थेच्या नियोजनात खेळाडू मग्न आहेत. मंगळवारी दुपारी या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.





 ज्येष्ठ फुटबॉलपटूंना उदघाटनाचा मान


यंदा स्पर्धेचे उदघाटन सात माजी फुटबॉलपटूंच्या हस्ते करण्याचा निर्णय संयोजकानी घेतला आहे. अजित क्रिडा मंडळाचे सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ खेळाडू ॲड. सदाशिव हंजी, मारूती लोहार, डॉ. सुरेश संकेश्र्वरी, अर्जून चौगुले, विलास मोहिते, बसवराज तुरबतमठ, महादेव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.