Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उत्कंठा संपली....चंदगड विधानसभा मतदारसंघातून डॉ. नंदाताई बाभुळकर यांनाच उमेदवारी

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर 


महाविकास आघाडीतील उमेदवारीचा तिढा सुटला 




मुंबई :
चंदगड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरीमुळे उमेदवारीचा निर्माण झालेला तिढा अखेर आज सुटला. या मतदारसंघातून डॉ. नंदाताई बाभुळकर यांची आज अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकूण 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत डॉ. बाभुळकर यांचा समावेश आहे. 



चंदगड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून सुरुवातीपासूनच डॉ. सौ. नंदाताई बाभुळकर ह्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत होत्या. मात्र महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे पक्ष शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नंदाताई बाभुळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यांना वगळून आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्यावी, प्रसंगी तुतारी चिन्हावर देखील आम्ही निवडणूक लढवू अशी भूमिका घेतल्याने येथील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता. त्यामुळे नंदाताईंची उमेदवारी निश्चित असणार  की अन्य कोणाला मिळणार?  याची उत्कंठा सर्वांना लागून राहिली होती. मात्र आज दुपारी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची 22 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली यामध्ये चंदगड विधानसभा मतदारसंघातून डॉ.नंदाताई बाभुळकर यांच्या नावाचा समावेश असल्याने अखेर येथील उमेदवारीचा तिढा सुटला असून उत्कंठा संपली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.