गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील बाप्पूसो आप्पासो कित्तुरकर वाचनालया मार्फत डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्म दिन 'वाचन प्रेरणा दिन' व 'वृतपत्र विक्रेता दिन' साजरा करण्यात आला.
प्रारंभी डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे प्रतिमेचे पूजन वाचनालयाचे अध्यक्ष बाळासो मोर्ती यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आला, तसेच वृतपत्र विक्रेता करवीरय्या स्वामी यांचा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळे प्रा. काशिनाथ सावेकर, मारुती कुरबेटी, सिदाप्पा बंदी, आप्पासाहेब कापसे, विरपास हुदली, वसंत नाईक, व्यकटेश बंदी, विरपाक्ष माने, इराप्पा कोरी उपस्थित होते. ग्रंथपाल महादेव भकरी यांनी आभार मानले.

