Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मुगळीतील वाचनालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात



गडहिंग्लज (प्रतिनिधी): मुगळी (तालुका गडहिंग्लज) येथील महात्मा गांधी सार्वजनिक मोफत वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश पाटील होते.




स्वागत सचिव आप्पासो जाधव यांनी केले. यावेळी ए. पी जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. आरती आरबोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी न्यू इंग्लिश स्कूल मुगळी शाळेच्या शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सौ. आरती आरबोळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका आर ए. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापिका पाटील म्हणाल्या, निरंतर वाचनाने ज्ञान वाढते. पैसे चोरीला जातात पण ज्ञान चोरीला जात नाही. वाचन करणारी माणसे ज्ञानाने श्रीमंत असतात. पोटाची भूक अन्नाने भागते  तसेच मेंदूची भूक म्हणजे वाचन होय. चांगली पुस्तके आणि चांगली माणसे ओळखता आली पाहिजे. आपल्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाचे पुस्तक व एक रुपयाचे खाऊ घेतले पाहिजे. तालुक्यामध्ये मुगळी सारख्या ग्रामीण भागात सुंदर असे वाचनालय आहे, त्याचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.




यावेळी कार्यवाह बी. जी. स्वामी, सुरेश पाटील, ए. बी. जाधव, ईश्वर हुल्लोळी, सागर आरबोळे, आरती आरबोळे, आर. ए. पाटील, के. डी. धनवडे, श्रीपाद स्वामी, सुरशेन प्रियद्रशी, एस. एम. शिंदे, राजू मांग यांच्यासह वाचक सभासद विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ उपस्थित होते. आभार के. डी. धनवडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.